Breaking

Tuesday, May 30, 2017

!! श्रीदत्तात्रेयप्रभू महाराज !!



महानुभावपंथात श्रीदत्तात्रेयप्रभूंचा अवतार हा त्रेता युगात पीता अत्रीऋषीपासून माता अनसूया यांच्या गर्भी जन्मलेला गर्भीचा अवतार होय. पौराणीक कल्पनेप्रमाणे किंवा इतर सांप्रदायांच्या मताप्रमाणे महानुभाव पंथियांना श्रीदत्तात्रेयप्रभूंचा हा अवतार ब्रम्हा-विष्णू-महेश यांचा 'तीन शीरे सहा हात असा एकत्र बांधा होय' हे मत मान्य नसून ते त्याला परब्रम्ह परमेश्वरावतार व संपूर्ण उभयदृश्यावतार माणतात. 

तद्वतच महानुभाव या अवतारास चतुर्भुज न माणता, 'मनुष्यवेषधारी होती' या श्रीचक्रधरस्वामींच्या उक्तीप्रमाणे द्विभूजच माणतात. ही दोन्ही मते महानुभाव पंथियांची श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या अवताराबाबतची मोठी मत भिन्नता स्पष्ट करतात.


महानुभावपंथीय वाङ्मयात श्रीदत्तात्रेयप्रभू अवताराच्या ज्या काही लीळा आलेल्या आहेत. या सर्वच लीळात या अवताराचे वीषेशत्व दीसुन येते. महानुभावीय मताप्रमाणे श्रीदत्तात्रेयप्रभूंचा अवतार हा उभयदृश्यावतार असल्यामूळे तो जीवोद्धारक अवतार होय. तथापी इतर अवतारापेक्षा या अवतारा वीषेशत्व काही वेगळेच आहे.


या अवताराचा आनखी एक वीषेश सांगतांना श्रीचक्रधरस्वामीं म्हणतात "श्रीदत्तात्रेयप्रभूचा ठाइ एकवीध जनुः" एकवीध जनुः म्हणजे त्या अवतारा बाबत कोनीच प्रतीकूल अथवा उदास नसून सर्वच जनलोक श्रीदत्तात्रेयप्रभूंबाबत अनुकुलच आहेत.

या अवताराचा आनखी एक वीषेश सांगतांना श्रीचक्रधरस्वामीं म्हणतात "ती वानी अमृतवर्षीनी" म्हणजे श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या नुसत्या बोलन्याने जीवाचे आदीदैवीक, आदीभौतीक व अध्यात्मीक हे तीन्ही ताप नाहीशे होतात, जसे अर्ळकाचे झाले.
या अवताराचा तीसरा वीषेश सांगतांना श्रीचक्रधरस्वामीं म्हणतात "या मार्गाशी श्रीदत्तात्रेयप्रभू आदकारणः" 'आदकारण' या शब्दाचा अर्थ वीषद करताना टीकाकार अवधूतमूनी वाइंदेशकर म्हणतात 'आदकारण म्हणिजे ज्ञानाशी कारणः स्वरूपाशी कारण' तद्वतच पूढे म्हणतात 'या मार्गाशी आमचे गोसावी कारणः तयाशी श्रीप्रभू कारणः श्रीप्रभूशी श्रीद्वारावतीकार कारणः श्रीद्वारावतीकाराशी आदीकारण श्रीदत्तात्रेयप्रभूः श्रीदत्तात्रेयप्रभूशी कारण व्यक्त की अव्यक्त हे नेणीजेः परी बाहुल्ले अव्यक्तचीः'

अश्या या श्रीदत्तात्रेयप्रभू महाराजांच्या अपूर्व अवताराचे भरभरून गूणवीषेश महानुभाव पंथिय वाङ्मयात वीषेशत्वाने आढळुन येते.

No comments:

Post a Comment