।। भजन ।।
(श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा
...)
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ।
अव्हेरू नका प्रभु तुमचाचि आसरा ।।धृ।।
मुळीचीच अविद्या मतित्रयाने ।
वाहातचि आलो अनिष्ट अविधीने ।
अनंत वेळा प्रमादचि घडला ।
भेटेल कसा देव या अधमाला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।1।।
ज्ञान असोनि ओखटेच झाले ।
निर्लज्ज होउनि पुन्हा पाप केले ।
पुन्हा पाप पुन्हा दुःख चक्रात पडला ।
रजातमाने व्यापून गेला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।2।।
खाण हिरेयाची खणत खणता ।
दरडीच पडली स्वामी जगन्नाथा ।
सूप आपण चाटू गहाण ठेवी पिता ।
आळ पुरवीसि श्रीचक्रधर माता ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।3।।
अनाथांच्या नाथा अनार्जित दाता ।
वरदान देउनि उद्धरी आता ।
ठकलो स्वामीराया भ्रमणात पडला ।
ठक फेडुनि प्रेम द्यावे कवीला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।4।।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ।
अव्हेरू नका प्रभु तुमचाचि आसरा ।।धृ।।
मुळीचीच अविद्या मतित्रयाने ।
वाहातचि आलो अनिष्ट अविधीने ।
अनंत वेळा प्रमादचि घडला ।
भेटेल कसा देव या अधमाला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।1।।
ज्ञान असोनि ओखटेच झाले ।
निर्लज्ज होउनि पुन्हा पाप केले ।
पुन्हा पाप पुन्हा दुःख चक्रात पडला ।
रजातमाने व्यापून गेला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।2।।
खाण हिरेयाची खणत खणता ।
दरडीच पडली स्वामी जगन्नाथा ।
सूप आपण चाटू गहाण ठेवी पिता ।
आळ पुरवीसि श्रीचक्रधर माता ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।3।।
अनाथांच्या नाथा अनार्जित दाता ।
वरदान देउनि उद्धरी आता ।
ठकलो स्वामीराया भ्रमणात पडला ।
ठक फेडुनि प्रेम द्यावे कवीला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।4।।
No comments:
Post a Comment