।। भजन ।।
(श्रीमूर्तीच लीळा आठविता ...)
श्रीमूर्तीच लीळा आठविता ।
तारून नेईल तो अघहंता ।।धृ।।
काटोल उधळीनाथासि भेटी ।
धानाइसा प्रभु सांगति गोष्टी
रेमनाक मूर्ती पाहाता ।
विस्मो मूर्ती प्रकाशी राउता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।1।।
श्रीमूर्तीच लीळा आठविता ।
तारून नेईल तो अघहंता ।।धृ।।
काटोल उधळीनाथासि भेटी ।
धानाइसा प्रभु सांगति गोष्टी
रेमनाक मूर्ती पाहाता ।
विस्मो मूर्ती प्रकाशी राउता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।1।।
देवाची उघडी मूर्ती पाहाति ।
डाळ्या पारणे राहिया म्हणति
उमाई राउळाचे नाव घेता ।
भेटीसि आले रूपाइचे पिता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।2।।
एकांकी श्रीचरणी उदक घालीति ।
महादाइसाचे अंग चुरति
भटासि क्षेउर जगदानी म्हणता ।
लाहामाइसा ज्वरी पडिताळिता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।3।।
पागडे पुरुषोत्तम देवाचे स्वीकरीति ।
चरणोदकाचे प्रसाद घेति ।
खडकुलीएसि सिमुगा सिंपिता ।
उमाइसासि अंगुठा लाविता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।4।।
यंत्रासनपूजा महादाश्रमाची ।
चोरी प्रकटीति मार्कंडेयाची ।
पौळी सिळा वाणे हातु लाविता ।
भक्ताकरवी सांडोवा बांधविता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।5।।
कामाइसा भेटी नामकरणे ।
भट लखुबाइसासि भांडणे ।
भांडारेकार देह सोडिता ।
सोभागाच मुखी केळ घालिता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।6।।
रुसले देव बुझावू धाडणे ।
पर्वती ससेयाचे रक्षण करणे ।
उद्धवार्जुनाचा अभिमान घेता ।
जानू थापटिली तै भगवंता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।7।।
No comments:
Post a Comment