Tuesday, June 20, 2017

।। भजन ।। (क्षणभर उघड नयन देवा ...) (Bhajan)


     ।। भजन ।।
(क्षणभर उघड नयन देवा ...)

क्षणभर उघड नयन देवा ।।धृ।।

करावया तव मंगल पूजा ।
देहदीप मी जाळीन माझा ।
भावभक्तीचा हा नजराणा ।
स्वीकरुनि घ्यावा । क्षणभर उघड ... ।।1।।


धूप दावीन विरहाग्नीचा ।
सुगंध सिरीन मंगलतेचा ।
कोमल पद हृदयावर ठेवून ।
प्रभु माझा यावा । क्षणभर उघड ... ।।2।।

काव्य नाही ओवी नाही ।
मुक्या जीवाने कशी रे गावी ।
लोचनातले अश्रु करतील ।
अखेरचा धावा । क्षणभर उघड ... ।।3।।

No comments:

Post a Comment