Sunday, June 11, 2017

॥ महदंबा तांबोळपत्रे आसुडणे ॥

एक वेळ भटोबास वीडा घेत होते :तंवं माहादाइसी भटोबासाचिए हातिचि पानें आसुडुनी घेतली आन टाकीली:आणि म्हणीतले:नागदया देवेवीण जीएजताए :हेची तंवं काइ पाने कैसी खाणे ? ऐसी कोपली:आन भटोबास उगेची राहीले मग एक दीसी :माहादाइसी बरवीया चोखा पानाचा विडा भटोबासासी दीधला: 


तो भटोबांसी उगेचि होते :आणि म्हणीतले :रूपै तै हातिचिं पानें आसुडिली:आणि आंता काइ म्हणौन देता ? आन माहादाइसी म्हणीतले:नागदया गोसावी म्हणीतले :
तुमचियाकडूनि तुम्हा कांहीचि न व्हावे आन एथौनि तुम्हां सकळै हो आवें :आन गोसावी म्हणीतले :प्रीति विखो होईजे :आता माझीए प्रीति वीखो होउनी घे :मग भटोबांसी वीडा घेतला :
ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण

No comments:

Post a Comment