बाइ पाप तरि नव्हे परि अविधी होए ॥1॥विधी करितां अविधी स्फुरे:अविधी अविधींते प्रसवे :अविधीतवं पुरूष धर्मापासौनि जाए ॥2॥
दृष्टांत ---
कव्हणी एकु कठीया असे:तो देवतेचां ठाइं अष्टौप्रहर वेचला असे:झाडी सडासमार्जन करी:स्तर्पण करी :त्रीकाळ पुजा करी :एकु दीसीं गांवीचां जेउं बोलावीला:तो पोटभरूनि जेवीला:एउनि देवतेपुढां बैसला:तें जाड्य आलें:तीए देवतेपुढां पाए पसरूनि निजैला :गजबजौनि उठीला: काइ माझी माउली माझें इतुलेंही नुपसाहे ?
म्हणौनि देवतेकडे पाए पसरूनि निजैला:एरी दीसी स्तर्पण करीतां पींडीण पाए लागति :मग हळुहळू पारिसेनीचि पाणियें स्तर्पण करी:पारीसींचि फुलें वाए :कालींचि झाडीले होते:कालीचि सडा घातला होता :आधी स्त्रीचेनि नांवे दांडेनि साइली पीटी :तेतुका समै स्त्री एकि आली:देवाची सेवा करू लाभे ? कां न लभे :देवाची सेवा काइ कव्हणा करवली असे ? म्हणौनी ते झाडी:तो सडा घाली:कांही भीक्षेसि धड गोड ए ते तीएसि सुए :एसे असत असतां संबंधु जाला:गुरूवीणि जाली :लेकरूवें जाली:मग तीये लेकुरूवे पींडीए जवळी हागति:मुतति :मग एकी दीसीं गांवीचां म्हणितले:कठिये हो :आतां तुम्ही लेकुरूवाळे जालेति:आतां गांवांतु घर बांधा :मग गांवांतु घर बांधले :मग तेचि पालापाणी घाली:आपण सेतडीया मागों जाए :मग सेतडीया मागौनि ये:कोनटेयापासि वाहाणा फेडी:दोन्ही हातु जोडुनि मग म्हणे :जए देवा:इतुके उरलें.
दार्ष्टान्तिक
----------------
तैसें अविधि अविधीतें प्रसवे .
ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण
दार्ष्टान्तिक
----------------
तैसें अविधि अविधीतें प्रसवे .
ई.श्री. भाईदेव बिडकर फलटण
No comments:
Post a Comment