Breaking

Sunday, June 11, 2017

॥ तथा आंबे मागणें ॥



एकु दी गोसावी म्हणीतले. आवो ! आंबे दे म्हणे.आवो आंबे दे दे दे ना म्हणे. म्हांइंभटी म्हणीतले. आवकाळीया दीसा आंबे कैसे ? भटी म्हणीतले. नांहीते काइ ? गोसावी मागत असति.आहाति म्हणौनि गोसावी मागताति की ! भाद्रपदु मासु. श्रावण आंबा आला होता. रायाकारणे वस्त्रे गुंडु गुंडु राखीले होते.बुढासि कांटीया लावीलीया होतीया. राखाणाइत ग्रीदा ग्रीदी राखत होते


 .भट म्हांइभट .कोथळोबा .वाळुकोबा .ऐसे अळजपुरासि गेले .म्हांइभटी आसु आंबा मागितला.परि ते नेदीतीची.मग भटी रीगावा नीगावा पाहीला.आंता काइ करूं पां ? भटी म्हणीतले. नां नीजेति तेहवळि रात्री चोरूनि कांढु .तैसीचि भीक्षा केली.नदीसि भोजन केले.मग मध्यान्ह एकी राञी आले. चोरवेळ नीरूति भट चाणेति.मग भटी हळुचि कांटी उपडीली. मग वाळुकोदयाचेया खांदावरि पाउ देउनि कोथळोबा आंबेयाविर वेंधले .शतभरि आंबे तोडीचे.एकी वासना.लोथभरि तोडीले.लोथ बांधली.मग निगाले.ते आडराने यात वाळकोबांचां पांइ धसु भरला.मग आले .गोसांवियांसि आंबे वोळगवीले.मग गोसावी म्हणीतले. ऐया माझा आतां होय म्हणजे.म्हणौनि आरोगीले.मग तीही म्हणतीले.जी .जी .! वाळुकोदयाचा पांइं धसु भरील ! मग गोसावी म्हणीतले. आवो बांध बांध तांबोळ बांध .मग श्रीमुखीचा तांबॅळ बांधला .दु:ख हरले.नीके जाले.आंबे मांचो घातले.मग आबैसी मांड केले .आंबे पीळीले.मग गोसावीयांसि ताट केले.मग गोसावी म्हणीतले ऐसा माझा आतांहोय म्हणे.मग आरोगणा जाली.
ई.श्री. भाईदेव बिडकर

No comments:

Post a Comment