Breaking

Tuesday, June 20, 2017

3:34 AM

।। भजन ।। (क्षणभर उघड नयन देवा ...) (Bhajan)


     ।। भजन ।।
(क्षणभर उघड नयन देवा ...)

क्षणभर उघड नयन देवा ।।धृ।।

करावया तव मंगल पूजा ।
देहदीप मी जाळीन माझा ।
भावभक्तीचा हा नजराणा ।
स्वीकरुनि घ्यावा । क्षणभर उघड ... ।।1।।

3:31 AM

।। भजन ।। (श्रीमूर्तीच लीळा आठविता ...) (Bhajan)


।। भजन ।। 
(श्रीमूर्तीच लीळा आठविता ...)

श्रीमूर्तीच लीळा आठविता ।
तारून नेईल तो अघहंता ।।धृ।।

काटोल उधळीनाथासि भेटी ।
धानाइसा प्रभु सांगति गोष्टी
रेमनाक मूर्ती पाहाता ।
विस्मो मूर्ती प्रकाशी राउता ।
तारून नेईल तो अघहंता ... ।।1।।
3:21 AM

।। भजन ।। (श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ...) (Bhajan)


                                      ।। भजन ।।

(श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ...)

श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ।
अव्हेरू नका प्रभु तुमचाचि आसरा ।।धृ।।

मुळीचीच अविद्या मतित्रयाने ।
वाहातचि आलो अनिष्ट अविधीने ।
अनंत वेळा प्रमादचि घडला ।
भेटेल कसा देव या अधमाला ।
श्रीचक्रधरराया चरणी द्या हो थारा ... ।।1।।